शेकडो व्यापार्यांची मानवी साखळी: सरकारला घातले साकडे | Sangli | Human Chain | Lockdown |Sakal Media
सांगली : कोरोना संकट काळात सरकारला जागे करण्यासाठी सांगलीत गोरगरिब भाजीपाला व्यापारी, पेठेतील व्यापारी, हातगाडेवाले, रिक्षावाले यांनी आज एक अनोखे आंदोलन केले. ना मोठमोठ्या घोषणा, ना रॕली, ना गर्दी... जिथे आपण उभे आहोत, तेथेच एक फलक हाती घेऊन ते उभे राहिले आणि सरकारला साकडे घातले. संकटात हक्कासाठीचा लढा दिलाच, पण कोरोना नियमांची ना पायमल्ली केली, ना नाहक शक्तीप्रदर्शनाचा बडेजाव. युवा नेते मा. पृथ्वीराज पवार भैय्या यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन झाले. संदेश पोहोचला, गरिबांची आता परीक्षा पाहू नका.
(बातमीदार: अजित झळके)
#Sangli #Coronavirus #Lockdown #humanchain #Traders #agitation